कागदी होड्या

130.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: kagadi hodya.pdf

 

कागदी होड्या करण्याचं एक वय असतं.
कागदाला घड्या घालायला शिकविणारं.
त्यांतून तयार होणाऱ्या आकारांत सौंदर्य शोधणारं.
या वयात कल्पनांचा-स्वप्नांचा
धो धो कोसळणारा पाऊस असतो.
रस्तोरस्ती साठलेलं ‘तुडुंब’ पाणी असतं.
कागदी होड्या या ‘समुद्रा’त हाकारण्याचं
दर्यावर्दीपणही या वयात खुणावत असतं.
या प्रवासात आनंदाचं उधाण येतं. वादळवारं येतं.
होड्यांची शिडं कोलमडतात.
मग पुन्हा नवा कागद. नवी होडी.
नवा पाऊस आणि नवा प्रवास!
कागदी होड्यांच्या अशा खेळात रमून गेलो असतानाच,
गावातल्या बिनभिंतीच्या निसर्गशाळेनं रेषांचे लोभस आकार,
मनमोहक रंग यांचं दालन खुलं केलं.
पक्ष्यांनी सूर दिले. लोकगीतं, भजनं यांनी कंठाला गोडीचा स्पर्श केला.
इथल्या अस्सल मातीनं शब्द दिले. निसर्गसंपन्नतेनं शब्दांना सौंदर्य दिलं.
असं होता होता गाव मनात नुसतं वस्तीलाच येऊन राहिलं नाही;
तर ते काळजात घर करून राहिलं. कायमस्वरूपी!