लेखक – प्रा. विवेक पोंक्षे , प्रा. महेन्द्र सेठिया
प्रथम आवृत्ती – डिसेंबर २०२०
पृष्ठसंख्या – ९६
अभ्यासातील स्वावलंबन भाग ३
₹80.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book:. अभ्यासातील स्वावलंबन भाग ३ snipet.pdf
परीक्षा म्हणजे भीती… अपयश… ताण… कशासाठी?खरं तर… परीक्षा म्हणजे संधी!स्वत:ला तपासण्याची, सिद्ध करण्याची!यशस्वी होण्यासाठी जिद्दीने व आत्मविश्वासाने धडपडण्याची!चुकांमधून, अपयशामधून शिकण्याची!दहावी-बारावीची परीक्षा हे निमित्त आहे अशी संधी घेण्याचे!अशी संधी घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाकडे घेऊन जाणारे पुस्तक!झटपट यशाची हमी देणारे झटपट वर्ग,मार्गदर्शके आणि आतूर किंवा चिंतातूर पॅटर्न्स यांच्या हल्लकल्लोळात,‘तुमचा अभ्यास तुम्ही स्वत:च केला पाहिजे’ असे आग्रहाने सांगणारे,आणि ‘विविध तंत्रे, पद्धती, कौशल्ये वापरून ते तुम्ही उत्तमपणे करू शकाल’असा विश्वास विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारे पुस्तक!उद्दिष्ट ठरवली, त्याला नियोजनाची जोड दिली,विविध अभ्यासकौशल्ये आत्मसात केलीआणि डोळसपणे परीक्षातंत्रांचा वापर केला तर खात्रीशीर यश मिळवता येतंहे अनुभवाच्या आधारे समजावून सांगणारे पुस्तक!आत्मविश्वासाने व सकारात्मकतेने विद्यार्थ्यांनी परीक्षेला कसं सामोरं जावं हे सांगणारं हे पुस्तक व ‘अभ्यासातील स्वावलंबन’या मालिकेतील आधीची दोन पुस्तके विद्यार्थ्यांइतकीच त्यांच्या पालकांना, शिक्षकांना, समुपदेशकांना निश्चितच उपयोगी ठरतील.
Reviews
There are no reviews yet.