ज्ञान प्रबोधिनी एक परीसस्पर्श

300.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: Parissparsha 51@51 – Snippet

ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत शिकलेल्या विद्यार्थ्यांचे नंतर काय होते? ते कुठे काम करतात? काय काम करतात? काही पराक्रम करतात का? काही नवोन्मेष त्यांच्या कामात दिसतात का? आपापल्या कामाच्या ठिकाणी ते नेते म्हणून काम करतात का? अशी विचारणा अनेक जण सातत्याने करत असतात. सुमारे तीस वर्षांपूर्वी केलेल्या प्राथमिक पाहणीमधून असे लक्षात आले की, तोपर्यंत दहावी झालेले जवळजवळ निम्मे विद्यार्थी शिक्षण पूर्ण होताच किंवा एक दोन वर्षे नोकरी करून स्वतःचा काहीतरी व्यवसाय करत होते. 50% विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगार आणि उद्योजकतेची वाट चालावी हे उल्लेखनीयच आहे. पण आम्ही देशाला 200 नेते देऊ, असे म्हणणा-या प्रबोधिनीकडून आता विविध क्षेत्रात नेतृत्व बहरताना दिसू लागले आहे. ही घडणीची प्रक्रिया म्हणजे परीसस्पर्श