पहिलेच पाहिजे असे काही – भाग २

100.00

पुस्तकाची झलक पाहा  See a snippet of the book: पाहिलेच पाहिजे असे काही भाग २ snippet.pdf

‘पाहिलेच पाहिजे असे काही…2′ या पुस्तकात वेगवेगळ्या आठ भारतीय भाषांमधील पंधरा निवडक चित्रपटांचा परिचय करून दिला आहे.
भाषा वेगळी असली तरी चित्रपटांची स्वत:ची अशी शब्दापलीकडची भाषा असते. जी अभिनयातून, चित्रीकरणातून, दिग्दर्शनातून, कथासूत्रातून आपल्याशी बोलत असते. मदतीला उपशीर्षके (सबटायटल्स्‌‍) असतातच!
हे पुस्तक वाचून विविध वाहिन्यांवर, माध्यमांवर उपलब्ध असणारे विविध भाषांमधील चित्रपट पाहाण्याची प्रेरणा तुम्हाला मिळावी, कुतूहल जागं व्हावं, आस्वादाची दिशा मिळावी इतका मर्यादित हेतू आहे. कारण एकदा का अशा सुंदर अनुभवांची ओढ तुमच्या मनाला लागली, तर अनेक देशी-विदेशी भाषांमधील आशयसंपन्न चित्रपटांचं भांडार तुमच्यासाठी खुलं आहे!