स्मृतिगंध (*)

200.00

पुस्तकाची झलक पाहा  See a snippet of the book: स्मृतिगंध snippet.pdf

ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक संचालक डॉ. वि. वि. तथा अप्पासाहेब पेंडसे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या आप्त, सुहृद, मानसपुत्र व मानस कन्यांनी त्यांच्या विविध पैलूंना उजाळा देणाऱ्या आठवणींचे संकलन या पुस्तकात केले आहे. कै.अप्पांचा प्रेमळपणा आणि करारीपणा, त्यांच्यातली जिद्द आणि आशावाद, त्यांची प्रतिभा आणि चतुरस्रपणा, त्यांचे संगीतप्रेम आणि विधायक आक्रमक वृत्ती हे सर्व गुण त्यांनी प्रबोधिनीच्या उभारणीसाठी आणि त्याद्वारे देशाचे रूप पालटण्यासाठी वाहिलेले होते. त्यांचे गुणकीर्तन केवळ स्मृतिरंजनासाठी करायचे नसून ते गुण आपल्यामध्येही देश्कार्यार्थ वाढवावेत आणि वापरावेत यासाठी हा स्मृतिगंध प्रेरणादायी ठरावा.